महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 11, 2019
8:14PM

राज्य उप निवडणूक आयुक्त चंद्र भुषण कुमार यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाची आढावा बैठक घेतली.

आकाशवाणी
राज्य उप निवडणूक आयुक्त चंद्र भुषण कुमार यांनी आज नाशिक इथे जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  नाशिक विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, राज्याचे विशेष खर्च निरीक्षक, आणि विशेष पोलिस महानिरीक्षक, विभागीय आयुक्त आदी उपस्थित होते.

यावेळी कुमार यांनी दिव्यांग मतदारांना मतदानासाठी आवश्यक  किमान सुविधा देण्यात याव्यात. विविध पथकांच्या प्रशिक्षणावर विशेष भर द्यावा आणि प्रशिक्षणात निवडणूक प्रक्रीयेतील प्रत्येक बाबीचा समावेश असेल याची दक्षता घ्यावी, मतदार स्लिपचे वाटप नियोजित वेळेत करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1