महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 11, 2019
3:53PM

जम्मू-कश्मीरच्या बालकांच्या स्थितीबाबत पाकिस्तानचा अपप्रचार

आकाशवाणी
जम्मू-कश्मीरमधल्या बालकांच्या स्थितीबाबत पाकिस्तान अपप्रचार करत असल्याबद्दल भारतानं पाकिस्तानचा समाचार घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांमधल्या भारताच्या स्थायी राजनैतिक मंडळाच्या प्रथम सचिव पौलोमी त्रिपाठी यांनी पाकिस्तानचं नाव न घेता सांगितलं, की शेजारचा देश शाळकरी मुलांच्या कोवळ्या मनावर हिंसक अतिरेकी विचार बिंबवून त्यांना दहशतवादी गटांमधे भर्ती करत आहेत.
आमसभेच्या ‘बालहक्क प्रोत्साहन आणि रक्षण’ या विषयावरच्या तिस-या समिती अधिवेशनात संयुक्त राष्ट्रातल्या पाकिस्तानच्या मावळत्या राजदूत मलीहा लोधी यांच्यात शेरेबाजीवर त्रिपाठी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
आपल्या देशातल्या अंतर्गत बाबींविषयी एक प्रतिनिधी अनावश्यक बोलत आहे, असं त्या म्हणाल्या. जगभरात बालकांच्या हक्कांविषयी दृष्टीकोन बदलला असला, तरी दारिद्र्य, संधीची विषमता, सशस्त्र संघर्ष, दहशतवाद आणि मानवतेच्या प्रश्नांची झळ त्यांनाच सर्वात जास्त बसते, असं त्यांनी सांगितलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1