महत्वाच्या घडामोडी
सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या साठवणूक योजनेचा प्रधानमंत्र्यां च्या हस्ते दिल्लीत प्रारंभ            प्रेस इन्फोरेशन ब्युरोच्या फॅक्ट चेककडून समाज माध्यमांवर फिरत असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधाच्या छायाचित्रांबद्द्ल सतर्कतेचे आदेश            संरक्षण क्षेत्रात येत्या पाच वर्षात देश पन्नास हजार कोटींच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य करेल संरक्षण मंत्र्याचं प्रतिपादन            देशातल्या सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोचं पुण्यात उद्घाटन            चौथ्या क्रिकेट कसोटीत भारताची अडखळत सुरुवात           

Oct 10, 2019
4:58PM

प्रचार सभा - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करू : देवेंद्र फडणवीस

आकाशवाणी
नाशिकसह राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निवडणूक संपताच आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्यात सटाणा इथं दिली . विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज त्यांची सटाणा आणि चांदवड इथं सभा झाली. यावेळी ते बोलत होते . आघाडी सरकारनं उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणार्या नारपार प्रकल्पावर  इतकी वर्ष केवळ राजकारण  केलं मात्र गेली पाच वर्ष भाजप सरकारनं  सातत्यानं पाठपुरावा करून कामाला मान्यता देऊन पाहणी सुरु आहे, असं ते म्हणाले. यावेळी कॉंग्रेसचे नगरसेवक ,माजी जिल्हापरिषद सदस्य पोपट अहिरे यांनी भाजपात प्रवेश केला. सांगली कोल्हापूरच्या पुराचं पाणी सोलापूर, मंगळवेढ्यासारख्या दुष्काळी भागात वळवण्यात येणार असून त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढ्यात सांगितलं. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सोलापूर दौऱ्यावर आले होते. राज्यात युतीला तुल्यबळ विरोधक नसल्यामुळे राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1