महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 09, 2019
5:19PM

विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग, राजकीय पक्षांनी प्रचाराची गती वाढवली

आकाशवाणी
 राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी पंधरावड्यापेक्षा कमी काळ उरला असल्यानं मतदारापर्यंत पोहण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रचाराची गती वाढवली आहे. जाहीर सभा, रोड शो, पदयात्रा आणि सामाजमाध्यमांवरुन प्रचार करण्याबरोबरच विविध राजकीय पक्षांचे नेते दारोदार प्रचार करत आहेत.  काल विजयादशमीला अनेक नेत्यांनी प्रचार मोहिमेचा ख-या अर्थांनं प्रारंभ करण्यासाठी मेळावे आणि जाहीर सभा आयोजित केल्या होत्या. विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु झाला आहे, पण समोर कोणी दिसत नसल्यामुळे मजाच येत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. धुळे जिल्ह्यात  नेर या गावी आज त्यांची पहिली प्रचार सभा झाली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. निवडणूक संपली की हे दोन्ही पक्षही पूर्ण संपतील असं ते म्हणाले.  महाआघाडीच्या जाहिरनाम्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. ज्यांना काहीही द्यायचं नसतं, ते अशी काहीही आश्वासनं देतात, त्यांच्या आश्वासनांमध्ये फक्त प्रत्येकाला एक एक ताजमहाल बांधून देवू,  हेच काय ते आश्वासन राहून गेलं असं त्यांनी सांगितलं.  गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा देखील मुख्यमंत्र्यांनी मांडला.  या सभेनंतर मुख्यमंत्री शिरपूर कडे रवाना झाले. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं राजेश पाडवी यांच्या प्रचारार्थ ते सभा घेणार आहेत. या सभेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित हे भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1