महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 08, 2019
7:38PM

भाजप अध्यक्ष अमित शाह युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात दाखल, अमित शाह राज्यात एकूण १८ सभा घेणार

आकाशवाणी
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणा-या आजच्या शिवसेना  दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यात पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.  निवडणुकीचे अर्ज भरणे, तपासणी आणि माघार घेणे ही निवडणूक विषयक प्रक्रिया आणि 9 दिवसांचा नवरात्र महोत्सव संपून आता निवडणूक प्रचाराला धडाक्यानं सुरुवात होऊ पहात आहे.
भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. अमित शाह राज्यात एकूण १८ सभा घेणार आहेत. लातूर पासून त्यांच्या प्रचारसभा सुरू होणार आहेत. प्रधानमंत्री विधानसभा निवडणूकांच्या प्रचारासाठी राज्यात ९ सभा घेणार आहेत. प्रधानमंत्र्यांची पहिली रॅली जळगाव इथे १३ आँक्टोबरला होणार असून त्यानंतर ते भंडाऱ्यातल्या साकोली इथं प्रचारसभा घेणार आहेत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1