महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 07, 2019
1:57PM

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं मुंबईच्या आरे कॉलनी भागातली झाडं कापण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला दिली स्थगिती

आकाशवाणी
सर्वोच्च न्यायालयाच्याखंडपीठानं मुंबईच्या आरे कॉलनी भागात मेट्रो रेल्वे यार्डच्या बांधकामासाठी झाडंकापण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली आहे. सर्वोच्चन्यायालयानं या प्रकरणाची सपूर्ण चौकशी करायची असून, केंद्रीय पर्यावरणमंत्रालयाला पक्षकार म्हणून अंर्तभूत करण्याची सूचनाही केली आहे. या प्रकरणीखंडपीठापुढे येत्या 21 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होईल. राज्य सरकारतर्फे सॉलिसिटरजनरल तुषार मेहता यांनी निर्णय होईपर्यंत यापुढे झाडं कापली जाणार नाहीत असंआश्वासन दिलं आहे, तसंच याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकर्त्यांची सुटकाकेली असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं आरे वनजमिनीला गैरवर्गीकृत वनमानलं असून तिथली झाडं तोडणं अवैध असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. आरेवनक्षेत्र गैरविकास क्षेत्र असल्याचं याचिकार्त्यांचं म्हणनं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1