महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Oct 05, 2019
11:30AM

सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि अर्थमंत्री हेंग स्वी कीट यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

air
सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि अर्थमंत्री हेंग स्वी कीट यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महात्मा गांधींच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रांनी न्यूयॉर्कमधे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाला सिंगापूरचे प्रधानमंत्री ली झिएन लूंग उपस्थित होते याबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं केलेल्या सुधारणांची कीट यांनी प्रशंसा केली. सिंगापूर आणि भारता दरम्यान वाढत्या सहकार्याबद्दल उभय नेत्यांनी आनंद व्यक्त केला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1