महत्वाच्या घडामोडी
सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या साठवणूक योजनेचा प्रधानमंत्र्यां च्या हस्ते दिल्लीत प्रारंभ            प्रेस इन्फोरेशन ब्युरोच्या फॅक्ट चेककडून समाज माध्यमांवर फिरत असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधाच्या छायाचित्रांबद्द्ल सतर्कतेचे आदेश            संरक्षण क्षेत्रात येत्या पाच वर्षात देश पन्नास हजार कोटींच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य करेल संरक्षण मंत्र्याचं प्रतिपादन            देशातल्या सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोचं पुण्यात उद्घाटन            चौथ्या क्रिकेट कसोटीत भारताची अडखळत सुरुवात           

Oct 05, 2019
11:12AM

भारताच्या भेटीवर आलेल्या बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसिना आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

air

भारताच्या भेटीवर आलेल्या बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसिना आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा करणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री रवीशकुमार यांनी दिली. ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. हे दोन्ही नेते दळणवळण, विकास प्रक्रियेतील परस्पर सहकार्य, आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित परस्पर हिताच्या मुद्यांवर चर्चा करतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दोन्ही नेते तीन प्रकल्पांचं संयुक्तपणे उद्घाटन करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या भेटीनंतर दोन्ही देशांमध्ये वाहतूक, दळणवळण, क्षमतावृद्धी, आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित सहा ते सात करार होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. यानंतर शेख हसीना आज दुपारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर हे देखील आझ शेख हसीना यांची भेट घेणार आहेत.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1