महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Oct 01, 2019
8:48PM

आयुष्यमान भारत योजना म्हणजे नव्या भारताच्या जडणघडणीसाठी उचलेलं क्रांतिकारक पाऊल

AIR
आयुष्यमानभारत योजना म्हणजे नव्या भारताच्या जडणघडणीसाठी उचलेलं क्रांतिकारक पाऊल आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली आयुष्यमान भारत योजनेच्या वर्षपूर्तीनिमीत्त आयोजित आरोग्य मंथन या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगीबोलत होते.भारतातल्या कोणताही व्यक्ती अद्ययावत आरोग्य सुविधांपासून वंचित राहणारनाही असं आश्वासनहीमोदी यांनी यावेळी दिलं. ही योजना  देशातल्या १३० कोटी नागरिकांच्यासामुदायिक निर्धाराचं प्रतिकआहे असं ते म्हणाले. यावेळी मोदी यांनी या योजनेच्या वर्षभरातल्याकामगिरीचाआढावाही घेतला. यावेळी मोदी यांनी आयुष्यमान भारत, पीएम – जय, आणि आयुष्यमान भारतस्टार्ट अप ग्रँड चॅलेंज या मोबाईल अॅपचं उद्घाटन केलं, तसंच आयुष्यमान भारत योजनेच्या वर्षपूर्तीनिमीत्त एका विशेष टपाल तिकीटाचं अनावरणही केलं. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1