महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
8:31PM

येत्या तीन वर्षांमध्ये देशभरात आणखी १ हजार कम्युनिटी रेडियो केंद्र उभारण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट

@PIB_India
येत्या तीन वर्षांमध्ये देशभरात आणखी १ हजार कम्युनिटी रेडियो केंद्र उभारण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. एका परवान्यावर एकापेक्षा जास्त केंद्र उभारता यावीत, या दृष्टीनं याबाबतच्या धोरणात आवश्यक बदल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी दिली.

चेन्नई मध्ये आयोजित दक्षिण विभागाच्या दोन दिवसीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून ते संबोधित करत होते. कम्युनिटी रेडियो केंद्रांनी सरकारी माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवून देशाला विकसित भारत बनवण्यामध्ये हातभार लावावा, असं आवाहन त्यांनी केलं. केंद्रसरकारनं २०१४ पासून कम्युनिटी रेडिओ केंद्रांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी प्रत्येकी साडे-सात लाख रुपयांची मदत आणि अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं यांनी म्हटलं आहे.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1