महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
8:31PM

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश

AIR
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईच्या भाजपा मुख्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. चव्हाण यांनी कालच काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. भाजपा प्रवेशावेळी कोणतीही मागणी केलेली नाही आणि दिली ती जबाबदारी स्वीकारू असंही ते म्हणाले. काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला किंवा सदस्याला भाजपामध्ये येण्यासाठी आग्रह केला नाही असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजप आणि महायुतीची शक्ती वाढली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. अशोक चव्हाण यांना राज्यसभा उमेदवारी देण्याच्या संदर्भात केंद्रीय नेतृत्त्व निर्णय घेईल, असंही फडणवीस म्हणाले. 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडताना काहीही कारण दिलं नाही. तपास यंत्रणांचा दबाव होता की काँग्रेसमधे अन्याय झाला,  याबाबत त्यांनी स्पष्ट सांगायला हवं होतं अशी अपेक्षा काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे महाविकास आघाडी कमजोर होणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या नेत्यांबरोबर आपली चर्चा झाली असून लौकरच जागावाटप जाहीर होईल, असं चेन्निथला यांनी सांगितलं. अजूनही वेळ गेलेली नाही, अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1