महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 14, 2024
10:55AM

भारत आणि युएई मिळून नवा इतिहास रचत असल्याचे प्रधानमंत्र्यांचे गौरवोद्गार

@airnewsalerts
भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील संबंधांना सातत्यानं नवी ऊर्जा मिळत असून दोन्ही देश २१ व्या शतकात नवा इतिहास रचत आहेत; या यशात अनिवासी भारतीयांचंही महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. अबूधाबी इथं अहलान मोदी या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी काल युएईमधील भारतीय समुदायाला संबोधित केलं. भारताला तुमचा अत्यंत अभिमान आहे; १४० कोटी भारतीयांचा हाच संदेश घेऊन आज आपण इथे आलो आहोत असं मोदी म्हणाले.

आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल-नाहयान आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत आणि यूएई दरम्यान विविध क्षेत्रातील सामंजस्य करार झाले. प्रधानमंत्री मोदी दोन दिवसांच्या संयुक्त अरब आमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्थेतर्फे अबूधाबीत उभारल्या गेलेल्या भव्य मंदिराचं उद्घाटन आज मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1