महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Nov 21, 2023
8:21PM

अनुसूचित जमाती अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाजाचा महामोर्चा

Air
धनगर समाजाला अनुसूचित जमाती अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यासाठी जालना शहरात आज सकल धनगर समाजानं महामोर्चा काढला. गांधी चमन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्हाभरातून आलेल्या धनगर समाजबांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.

मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य कुणी अधिकारी न आल्यानं मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. काहींनी आवारातळ्या गाड्यांच्या काचा फोडल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून बाहेर काढलं. त्यानंतर धनगर समाजाच्या एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना आपल्या मागण्यांचं  निवेदन सादर केल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1