महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार            विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री            महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप            कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा            भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक           

Nov 21, 2023
1:34PM

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या हुतात्म्यांना राज्याची आदरांजली

AIR
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. मुंबईत हुतात्मा चौक इथल्या हुतात्मा स्मारकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. ‘या १०७ हुतात्म्यांच्या बलिदानामुळेच मुंबई महाराष्ट्राला मिळाली असून त्यांचं  बलिदान कधीही विसरता येणार नाही’, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली. शहिदांना केवळ अभिवादन करून उपयोग नाही तर आपलं  राज्य प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेऊन त्यांचा नावलौकिक सदैव अबाधित ठेवणं,  हीच या हुतात्म्यांना खरी आदरांजली ठरेल, असं ते म्हणाले. कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1