महत्वाच्या घडामोडी
सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या साठवणूक योजनेचा प्रधानमंत्र्यां च्या हस्ते दिल्लीत प्रारंभ            प्रेस इन्फोरेशन ब्युरोच्या फॅक्ट चेककडून समाज माध्यमांवर फिरत असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधाच्या छायाचित्रांबद्द्ल सतर्कतेचे आदेश            संरक्षण क्षेत्रात येत्या पाच वर्षात देश पन्नास हजार कोटींच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य करेल संरक्षण मंत्र्याचं प्रतिपादन            देशातल्या सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोचं पुण्यात उद्घाटन            चौथ्या क्रिकेट कसोटीत भारताची अडखळत सुरुवात           

Oct 30, 2023
1:44PM

आंध्र प्रदेशात झालेल्या दोन रेल्वे अपघातात मृतांची संख्या ११ वर

Air
आंध्र प्रदेशात विजयनगरम जिल्ह्यात काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या ११ वर पोहचली असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. पलासा पॅसेंजर गाडीने रायगढ पॅसेंजर गाडीला कंकटपल्ली इथं मागून धडक दिली.या धडकेत गाडीचे तीन डबे रूळावरून घसरले अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. जखमींना विशाखापट्टणम आणि विजयनगरम इथल्या रुग्णालयात दाखल केलं आहे. राज्य सरकार आणि रेल्वेच्या बचाव पथकांकडून बचावकार्य सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. रेल्वेमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना १० लाख रूपये, गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रेल्वेमंत्र्यांच्या संपर्कात असून प्रधानमंत्र्यांनी त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. प्रधानमंत्र्यांनी शोकाकुल कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आहे आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेश सरकारने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड शोकाकुल कुटुंबांप्रती दुःख व्यक्त केलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1