महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 22, 2023
2:47PM

इस्राएलने हमास विरोधात सुरू केलेलं युद्ध म्हणजे सभ्यतेचा असंस्कृततेविरुद्ध लढा - इस्रायलचे प्रधानमंत्री

AIR
इस्राएलने हमास विरोधात सुरू केलेलं युद्ध म्हणजे सभ्यतेचा असंस्कृततेविरुद्ध लढा असल्याचं  इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. गाझा पट्टीतला संघर्ष आणि हमास या दहशतवादी संघटनेविरोधातल्या कारवाईच्या मुद्यावर नेतान्याहू यांनी काल इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाडस यांची भेट घेऊन चर्चा केली.

या चर्चेत त्यांनी हा दावा केल्याचं त्यांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. हमासनं निरपराध लोकांची हत्या, बलात्कार, जाळपोळ अशी अमानवी कृत्य केली आहेत, त्यांच्या विरोधातला हा लढा म्हणजे सभ्यतेची कसोटी असून त्यात इस्रायला विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

आयसीस विरोधात उभ्या ठाकलेल्या सर्व देशांनी हमासविरोधातही एकत्र लढा द्यावा अशी आपली अपेक्षा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या युद्धात इटलीचा इस्रायला पाठिंबा असेल असं आश्वासन मेलोनी यांनी या भेटीत दिलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1