महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 19, 2023
8:20PM

ऑपरेशन अजयच्या माध्यमातून आतापर्यंत अंदाजे १२ शे भारतीय मायदेशी परत

AIR
युद्धग्रस्त इस्राएल मधून ऑपरेशन अजयच्या माध्यमातून आतापर्यंत अंदाजे १२ शे भारतीयांना मायदेशी परत आणलं गेलं आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली.यामध्ये १८ नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.भारताचं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असून, परिस्थितीनुसार तल अवीव इथून विमानांची आणखी उड्डाणं  नियोजित केली जातील,असं ते म्हणाले. इस्राएलवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला असून,कोणत्याही प्रकारच्या दहशतवादा विरोधात संपूर्ण जगानं एकत्र यायला हवं असं ते यावेळी म्हणाले. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1