महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Sep 25, 2023
1:30PM

नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत संमत झाल्याचं वनवासी कल्याण आश्रम संस्थेनं केलं स्वागत

AIR
नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत संमत झाल्याचं वनवासी कल्याण आश्रम संस्थेनं स्वागत केलं आहे. आदिवासी महिला लोकप्रतिनिधी समाजाचा आवाज उठवू शकतील, असं संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 
देशाच्या अमृत काळात या विधेयकाला जवळजवळ सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊन भारताच्या लोकतांत्रिक पद्धतीचं सकारात्मक उदाहरण वैश्विक स्तरावर ठेवलं आहे.

भारतात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत चालला आहे. नारी शक्ती वंदन विधेयकामुळे लेकसभेत, राज्यसभेत तसंच विधानसभांमधे महिलांची उपस्थिती वाढेल आणि महिलांच्या प्रश्नांना वाचा फुटेल आणि ते प्रश्न सोडवणंही शक्य होईल, असं संस्थेचे अखिल भारतीय संघटन मंत्री, अतुल जोग यांनी सांगितलं.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1