महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 23, 2023
1:46PM

G-20 शिखर परिषदेच्या यशाचं श्रेय G-20 संघाच्या सामूहिक प्रयत्नांना असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

AIR
G-20 शिखर परिषदेच्या यशाचं श्रेय ही परिषद व्यवस्थित पद्धतीनं चालू राहावी यासाठी काम करणाऱ्या G-20 च्या संघाला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल भारत मंडपममध्ये G-20 परिषदेच्या आयोजनात सहभागी अधिकाऱ्यांबरोबर ते संवाद साधत होते. या अधिकाऱ्यांनी त्यांचे अनुभव शब्दबद्ध करावेत ज्यामुळे भविष्यातल्या आयोजनासाठी ते  दिशादर्शक होईल, अशी सूचना त्यांनी केली. G-20 चं यश म्हणजे जगभरात लिहिली गेलेली संपादकीयं नसून, जगभरात भारताविषयी तयार झालेला विश्वास आहे, असं त्यांनी नमूद केलं. दिल्लीत २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत अनेक गोष्टींमुळे भारताविषयी अनादर निर्माण झाल्याची आठवण त्यांनी करून दिली आणि देशाचं ब्रँडिंग करण्याची संधी गमावण्यात आली, असं सांगितलं.जागतिक पातळीवरच्या संकटांमध्ये मदतींमध्ये भारतानं दिलेल्या योगदानामुळे भारताचा विश्वास वाढत आहे, असं सांगून त्यांनी नेपाळ आणि तुर्कीयेतील भूकंप, फिजीतील चक्रीवादळ, मालदीवमधील पाणी संकट, श्रीलंकेतील आर्थिक पेच आणि येमेनमधील संकट अशी उदाहरणं दिली. अशा विविध पेचांमध्ये भारताकडून दिल्या जाणाऱ्या मदतीमुळे भारत बलवान आहे आणि गरज असलेल्या सर्वांपर्यंत मदतीचा हात पुढे करत आहे, अशी धारणा तयार होत आहे, असं त्यांनी सांगितलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1