महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Sep 22, 2023
1:46PM

करोडो देशवासियांनी स्पष्ट बहुमताने सरकार निवडून दिल्यामुळेच हे विधेयक आणि महिलांच्या उन्नतीसाठीच्या इतर अनेक सुधारणा शक्य झाल्या असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

AIR
नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत एकमतानं मंजूर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व महिलांचं अभिनंदन केलं आहे. हे विधेयक संसदेत एकमताने मंजूर झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी भाजपा महिला मोर्चातर्फे नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते.  करोडो देशवासियांनी स्पष्ट बहुमताने सरकार निवडून दिल्यामुळेच नारी शक्ती वंदन विधेयक आणि महिलांच्या उन्नतीसाठीच्या इतर अनेक सुधारणा शक्य झाल्या असं प्रधानमंत्री म्हणाले. भाजपा सरकारने त्रिवार तलाकची प्रथा मोडून काढणारा कायदा, बेटी बचाव बेटी पढाओ योजना, सुकन्या समृद्धी योजना अशी अनेक पावलं महिलांच्या कल्याणासाठी उचलली अशी माहिती त्यांनी दिली. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी तसंच मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1