महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 21, 2023
8:10PM

रेल्वे अपघातानंतर दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत रेल्वेकडून १० पटीने वाढ

AIR
रेल्वे अपघातानंतर दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत रेल्वेने १० पट वाढ केली आहे. रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास पूर्वी ५० हजार रुपये दिले जायचे. त्याऐवजी आता ५ लाख रुपये दिले जातील. जखमींना दिली जाणारी २५ हजारांची मदत वाढवून अडीच लाख रुपये करण्यात आली आहे. किरकोळ जखमींना आता ५ हजारांऐवजी ५० हजार रुपयांचा मोबदला मिळेल. मदतीच्या रकमेशिवाय अपघातानंतर प्रवाशांचा रुग्णालयाचा खर्चही रेल्वे उचलणार आहे. मानवरहित रेल्वे फाटकावर अपघात झालेल्यांना, विनापरवानगी आत घुसलेल्यांना आणि रेल्वेच्या वरच्या तारांना स्पर्श झाल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांना कोणतीही अनुग्रह रक्कम दिली जाणार नाही, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1