महत्वाच्या घडामोडी
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक कायदेशीर चौकट तयार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            G-20 शिखर परिषदेच्या यशाचं श्रेय G-20 संघाच्या सामूहिक प्रयत्नांना असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत संपन्न            शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागानं १० किनारी राज्यांतील ७३२ कृत्रिम भित्तिका केंद्र केली मंजुर           

Jun 09, 2023
2:33PM

भारत आणि सर्बिया दरम्यानचा व्यापार ३२० दशलक्ष युरोवरून १ अब्ज युरोवर नेण्याबाबत भारताच्या राष्ट्रपती आणि सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात सहमती

Air

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सर्बिया दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यांनी काल सर्बियाची राजधानी बेलग्रेड इथं सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांच्याशी द्विपक्षीय व्यापारावर चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार या दशक अखेरपर्यंत सध्याच्या ३२० दशलक्ष  युरोजवरून एक अब्ज युरोवर न्यायला दोन्ही नेत्यांनी मान्यता दिली. द्रौपदी मुर्मू सध्या तीन दिवसांच्या सर्बियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी झालेल्या प्रतिनिधीमंडळ स्तरीय चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी विविध क्षेत्रात सहकार्य करायला सहमती दर्शवली. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांनी भारतीयांना व्हिजा देण्याच्या प्रक्रियेचं सुलभीकरण करण्याचं वचन दिलं. भारत-सर्बियादरम्यानची थेट विमानसेवा लवकरच सुरू होईल आणि यामुळे पर्यटन आणि व्यवसायाला चालना मिळेल, अशी आशाही दोघांनी व्यक्त केली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1