महत्वाच्या घडामोडी
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक कायदेशीर चौकट तयार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            G-20 शिखर परिषदेच्या यशाचं श्रेय G-20 संघाच्या सामूहिक प्रयत्नांना असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत संपन्न            शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागानं १० किनारी राज्यांतील ७३२ कृत्रिम भित्तिका केंद्र केली मंजुर           

Jun 09, 2023
10:31AM

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची कॅनडावर टीका

Air

कॅनडामध्ये काही गटांनी भारताच्या माजी प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येची घटना साजरी केल्याबद्दल, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडाला फटकारलं आहे. फुटीरतावादी, अतिरेकी तसंच कॅनडामध्ये होत असलेल्या हिंसाचाराचं समर्थन करणाऱ्यांना दिली जाणारी मोकळीक, कॅनडाच्या भारतासोबतच्या संबंधांसाठी तसंच त्यांच्या स्वतःच्या हितासाठी चांगली नाही, असा सल्लाही जयशंकर यांनी दिला आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. केवळ मतांच्या राजकारणासाठीच हे घडू दिलं जात असल्याचं भारताला वाटतं असंही जयशंकर यावेळी म्हणाले.

कॅनडात शिकत असलेल्या ७०० भारतीय विद्यार्थ्यांना माघारी पाठवण्याचा तिथल्या अधिकाऱ्यांचा विचार आहे, मात्र चांगल्या शिक्षणाच्या हेतूनं आलेल्या विद्यार्थ्यांना अशी शिक्षा देणं योग्य वाटत नाही, असं मत जयशंकर यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केलं. या विद्यार्थ्यांची काही चूक नसेल तर यावर तोडगा काढण्यासाठी भारत कॅनडा सरकारवर दबाव आणायचा प्रयत्न करेल असं जयशंकर म्हणाले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1