महत्वाच्या घडामोडी
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक कायदेशीर चौकट तयार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            G-20 शिखर परिषदेच्या यशाचं श्रेय G-20 संघाच्या सामूहिक प्रयत्नांना असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत संपन्न            शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागानं १० किनारी राज्यांतील ७३२ कृत्रिम भित्तिका केंद्र केली मंजुर           

Jun 09, 2023
10:28AM

जगाचं तापमान प्रत्येक दशकात शून्य पूर्णांक दोन अंशांनी वाढत असल्याचा ५० आघाडीच्या शास्त्रज्ञांचा इशारा

Air

जगाचं तापमान प्रत्येक दशकात शून्य पूर्णांक दोन अंशांनी वाढत असल्याचा इशारा ५० आघाडीच्या शास्त्रज्ञांनी दिला. २०१३ ते २०२२ या कालावधीत मानवनिर्मित तापमानवाढीच्या पातळीत शून्य पूर्णांक दोन अंशांची अभूतपूर्व वाढ झाल्याचं त्यांनी आपल्या संशोधनात म्हटलं आहे. या काळात कार्बनडाय ऑक्साइडच्या उत्सर्जनाची पातळी आत्तापर्यंतच्या सर्वोच्च बिंदूवर, म्हणजेच ५४ बिलियन टन प्रति सेकंदवर गेली असंही त्यांनी सांगितलं. हरितगृह वायूंचं विक्रमी उत्सर्जन आणि वाढत्या हवाप्रदूषणामुळे जागतिक तापमानवाढीचा वेग वाढला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ही नवी आकडेवारी दुबई इथं या वर्षी होणाऱ्या कॉप २८ हवामान परिषदेत जागतिक नेत्यांसमोर ठेवली जाईल. २०१५ च्या पॅरिस करारातल्या तापमानविषयक ध्येयांच्या पूर्ततेसाठीच्या वाटचालीचा आढावा या परिषदेत घेतला जाणार आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1