महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

May 09, 2023
4:23PM

इस्लामिक जिहाद या अतिरेकी गटावर केलेल्या हवाई हल्ल्यात १२ जण ठार

Air


इस्राएलनं गाझा मधल्या इस्लामिक जिहाद या अतिरेकी गटावर आज केलेल्या हवाई हल्ल्यात १२ जण ठार झाले आहेत. इस्लामिक जिहाद संघटनेच्या तीन नेत्यांवर आणि या गटाशी संबंधित शस्त्रास्त्र बनवण्याच्या ठिकाणांवर आपण हल्ला केल्याचा दावा इस्राईलच्या लष्करानं केल्याचं स्थानिक वृत्त संस्थेनं म्हटलं आहे.

इस्रायली लष्करानं गाझाच्या 40 किलोमीटर परिसरातल्या नागरिकांना बॉम्ब हल्ल्यांपासून आपला बचाव करण्यासाठी आश्रयस्थानांमध्ये जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद चळवळीनं एका निवेदना द्वारे, आपले तीन नेते मारले गेल्याचं तसंच महिला आणि मुलांसह अनेक जण जखमी झाल्याचं जाहीर केलं आहे. 2007 मध्ये हमासनं पॅलेस्टिनी प्रदेशाचं  ताबा घेतल्यापासून इस्रायल आणि गाझा दहशतवादी यांच्यात अनेक युद्ध झाली आहेत.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1