महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 13, 2022
2:31PM

माहितीचं आदानप्रदान विश्वासाहार्य आणि त्वरित होण्यासाठी डेटा व्यवस्थापन योग्य असण्याची आवश्यकता -अमिताभ कांत

Air
भारत सरकार देशात डेटा व्यवस्थापनाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करत आहे. G-२० देशांनी  सद्यपरिस्थित विकासासाठी माहितीचं आदानप्रदान विश्वासाहार्य आणि त्वरित होण्यासाठी योग्य डेटा व्यवस्थापनाची  आवश्यकता आहे, असं मत G -२० चे भारताचे  शेरपा अमिताभ कांत यांनी व्यक्त केलं. 

ते आज मुंबईत सुरु असलेल्या G-२० च्या विकास कृती गटाच्या पहिल्या बैठकीतल्या आंतरराष्ट्रीय  प्रतिनिधींना संबोधित करत होते. जगभरातल्या नागरिकांना डेटा सहज उपलब्ध व्हायला हवा यावर कांत यांनी यावर भर दिला. 

‘राष्ट्रीय डेटा विश्लेषण मंचाद्वारे’ शासन पातळीवर भारत अधिक कुशलपणे काम करत असून प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली G -२० चं अध्यक्षपद निर्णायक पध्दतीनं आणि सर्वसमावेशक पद्धतीनं निभावलं जाईल, असं कांत  यावेळी म्हणाले. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव  चंद्रशेखर यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे या बैठकीला संबोधित केलं. दरम्यान, बंगळुरू इथं G-२० च्या विविध प्रमुख मुद्द्यांवर आज बैठका होत असून यात जगभरातले १८० पेक्षा वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1