महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 25, 2022
7:23PM

ऑकलंड इथं झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात न्युझिलंडकडून भारत पराभूत

@BCCI
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऑकलंड इथं आज झालेल्या मालिकेतल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलडनं भारताचा ७ गडी राखून सहज पराभव केला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १- ० अशी आघाडी घेतली आहे.  विजयासाठी ३०७ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडनं ४८ व्या षटकातच लक्ष्य पूर्ण केलं. त्यांची ३ बाद ३०९ अशी धावसंख्या झाली.

टॉम लॅथमनं न्यूझीलंडसाठी १०४ चेंडूत १४५ धावांची खेळी केली. तो नाबाद राहिला. त्यालाच सामनावीराचा सन्मान मिळाला.  केन विल्यमसननं ९४ धावा करून त्याला सुरेख साथ दिली. तत्पूर्वी भारतानं ५० षटकात ७ गडी बाद ३०६ धावा केल्या. श्रेयस  अय्यरनं ७६ चेंडूत ८० धावा केल्या. शिखर धवननं ७२, शुभमन गिलनं ५० धावा करून भारताच्या धावसंख्येला आकार दिला. पुढचा एकदिवसीय सामना येत्या रविवारी हॅमिल्टन इथं होणार आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1