महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 25, 2022
5:19PM

पर्यावरण संरक्षणासाठी सर्व देशांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं आवाहन

@rajnathsingh

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसंच व्यापक असमानते विरुध्द लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित भारत प्रशांत क्षेत्रीय संवाद २०२२ या कार्यक्रमात बोलत होते.

विनाशकारी युध्द आणि संघर्षाची पर्वा न करता सर्व देशांनी एकत्रीतपणे या समस्यांचा सामना करायला हवा, असंही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, बाली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युद्धाच्या युगाचा अस्त झाल्याचं म्हटलं होतं. प्रधानमंत्र्यांच्या या संदेशाचं सर्व देशाच्या नेत्यांनी स्वागत केलं. सामुहिक सुरक्षेचा मापदंड बदलण्याची गरज सिंग यांनी व्यक्त केली. जगाच्या आर्थिक स्थैर्यासाठी भारत - प्रशांत क्षेत्राचा विकास होणं गरजेचं आहे. विभिन्न देशातल्या सागरी मार्गांमुळे व्यापार वाढीला चालना मिळाली असल्याचं ते म्हणाले. भारत- प्रशांत क्षेत्रात आसियानची मध्यवर्ती भूमिका स्वागतार्ह आहे. बहुपक्षीय नितीचं ध्येय वर्तालाप  करुनच साध्य होईल, यावर त्यांनी जोर दिला.
    

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1