महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 25, 2022
3:08PM

लीथ सॉफ्ट शेल प्रजातीच्या कासव संवर्धनाच्या भारताच्या प्रस्‍तावाला पनामा वन्‍यजीव शिखर संमेलनात मान्यता

air

लीथ सॉफ्ट शेल प्रजातीच्या कासवांचं संरक्षण वाढवण्याच्या भारताच्या प्रस्‍तावाला  पनामा वन्‍यजीव शिखर संमेलनात मान्यता मिळाली आहे. लुप्‍तप्राय प्रजातींच्या आंतरराष्‍ट्रीय व्‍यापार कराराअंतर्गत लीथ सॉफ्ट शेल कासवांचं सरंक्षण वाढवण्यासाठी या प्रजातिला परिशिष्ट- दोन मधून परिशिष्ट- एक मध्ये स्‍थानांतरित करण्याचा प्रस्‍ताव भारतानं ठेवला होता.

हा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळं या कासवांच्या आंतरराष्‍ट्रीय व्‍यापाराला आळा बसू शकेल. लीथ सॉफ्ट शेल प्रकारची कासवं भारतात काही निवडक नद्या आणि तलावांमध्ये आढळतात. गेल्या तीस वर्षांमध्ये यांची संख्या ९० टक्के घटली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1