महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 25, 2022
3:00PM

लचित बारफुकन यांच्या ४०० व्या जयंती महोत्सवाचा नवी दिल्लीत सांगता समारोह

आकाशवाणी

सेनापती लचित बारफुकन या महान नायकाची जयंती अमृत काळात साजरी करण्याची संधी मिळाली, हे लक्षणीय असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं आसाममधले अहोम जिल्ह्यातले सेनापती लचित बारफुकन यांच्या ४०० व्या जयंती महोत्सवाचा सांगता समारंभ झाला. भारतात जेव्हा जेव्हा काही आव्हानात्मक परिस्थिती उभी राहिली तेव्हा तेव्हा एखाद्या विभूतीनं अवतार घेतला, असं त्यांनी सांगितलं.

भारताची जीवनज्योत अमर आहे, तलवारीच्या जोरावर भारताचा शाश्वत वारसा मिटवू पाहणाऱ्यांना कडक उत्तर देणं भारताला चांगलंच जमतं, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आसामचा इतिहास हा भारतीय गौरव गाथेतील अनमोल वारसा असल्याचंही ते म्हणाले. सेनापती लचित बारफुकन यांच्या जीवनावरच्या एका ग्रंथाचं प्रकाशनही यावेळी झालं. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1