महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 25, 2022
10:18AM

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला

air
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्या साठीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून,सर्वच पक्षांचे नेते प्रचारसभा, रोड शो आदी माध्यमातून उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. आज गुजरातमध्ये माहुडा, जालोड, वाघारा आणि नरोडा इथ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा होत असून,केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी वलसाड जिल्ह्यात दोन प्रचारसभांमध्ये भाग घेणार आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला आणि अलोक शर्मा अहमदाबाद इथ पत्रकार परिषद घेणार असून, आम आदमी पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते तसच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील अनेक ठिकाणी रोड शो करणार आहेत. 

दरम्यान, पहिल्या टप्प्यात गुजरात विधानसभेच्या 89 जागांसाठी येत्या 1 डिसेंबरला  मतदान होणार असून,यासाठी विविध पक्षांचे 788 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत . यापैकी 167 उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल असून,त्यापैकी 100 जणांवर खून,बलात्कार आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1