महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 16, 2022
8:13PM

G-20 अध्यक्षपदाची सूत्रं इंडोनेशियाकडून भारताकडे सुपूर्द

आकाशवाणी

 बाली इथं आज झालेल्या G-20 शिखर परिषदेच्या समारोप सत्रात इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे जी-20 अध्यक्षपदाची सूत्रं सोपवली. 
भारताकडे G20 च्या अध्यक्षपदाची सूत्रं येणं ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचं मोदी म्हणाले. ते म्हणाले की, भारत वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये G20 परिषदेच्या बैठका आयोजित करेल आणि G20 ला जागतिक बदलासाठी प्रोत्साहन दिलं जाईल, G20 धोरणामध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य असायला हवं यावरही त्यांनी भर दिला.

पुढच्या वर्षी ही परिषद भारतात होणार आहे.दरम्यान, परिषदेच्या तिसऱ्या सत्रात डिजिटल परिवर्तन या विषयावर नरेंद्र मोदी यांनी आपले विचार मांडले. देशात सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांच्या वाढीवर त्यांनी भर दिला. जी-ट्वेंटीच्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात विकासासाठी डेटा हा महत्वाचा विषय असेल, असं त्यांनी सांगितलं. डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर हा गरिबीविरुद्धच्या  लढ्यात महत्त्वाचा घटक बनू शकतो, तसंच हवामान बदलाविरूद्धच्या लढाईत देखील  उपयुक्त ठरू शकतो, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1