महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 16, 2022
8:11PM

शाश्वत कृषी आणि अन्न व्यवस्था तसंच पुरवठा साखळी निर्माण करण्याच्या दृष्टीनं बदलांना गती देण्याचं G-20 देशांचं आवाहन

Aakashvani

शाश्वत कृषी आणि अन्न व्यवस्था तसंच पुरवठा साखळी निर्माण करण्याच्या दृष्टीनं बदलांना गती देण्याचं आवाहन G-20 देशांनी केलं आहे. इंडोनेशियात बाली इथं झालेल्या G-20 शिखरपरिषदेचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला आहे. त्यात अन्न सुरक्षा आणि अन्न पुरवठा साखळीला अग्रक्रम दिला आहे. आंतरराष्ट्रीय ताण तणाव आणि संघर्षामुळे जगासमोर उद्भवलेल्या उपासमारी आणि कुपोषण या समस्यांविषयी जी ट्वेंटी देशांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जगात कुठेही भूक किंवा अन्नटंचाईचा सामना करणाऱ्यांना मदत करण्याचा निर्धार सर्व सदस्य राष्ट्रांनी व्यक्त केला आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या संघर्षाविषयी जाहीरनाम्यात नाराजीचा सूर आहे. ही वेळ युद्धाची नाही या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना दिलेल्या सल्ल्याचं प्रतिबिंब या विषयीच्या ठरावात उमटलं आहे. युद्धामुळे केवळ दोन राष्ट्रात तणाव निर्माण होतो असं नव्हे तर जगात सर्वत्र महागाई, बेरोजगारी आणि मानवी यातना अशी संकटं निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि कोणत्याही मतभेदांचं चर्चेच्या मार्गाने निराकरण हेच मार्ग योग्य ठरतील असा विश्वास जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1