महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 15, 2022
7:37PM

खतांची, पर्यायानं अन्नाची टंचाई आणि उपासमारीवर भरड धान्य हा उपाय - नरेंद्र मोदी

आकाशवाणी

खतांची, पर्यायानं अन्नाची टंचाई आणि उपासमारी यावर बाजरी सारखी पौष्टिक भरड धान्य हा उपाय ठरु शकतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे. ते इंडोनेशियातील बाली इथं आज G-20 च्या अन्न आणि ऊर्जा सुरक्षेच्या  पहिल्या कामकाजाच्या सत्राला संबोधित करताना  मोदी बोलत होते. जगात खत आणि अन्नधान्य या दोन्हींची पुरवठा साखळी स्थिर ठेवण्यासाठी परस्पर करार करण्याचं आवाहन मोदींनी जागतिक नेत्यांना केलं. अन्न सुरक्षेच्या संदर्भात प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की, भारत शाश्वत अन्नसुरक्षेसाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत असून बाजरीसारख्या पौष्टिक आणि पारंपारिक भरड धान्याला लोकप्रिय करण्यासाठी पुढचं वर्ष 'आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष'  म्हणून साजरं केलं जाईलं. असं  मोदी यांनी सांगितलं.

जगानं मुत्सद्देगिरीचा मार्ग पत्करून युक्रेनमध्ये युद्धविराम केला पाहिजे. जगात शांतता, सौहार्द आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित आणि सामूहिक संकल्प दाखवणं ही काळाची गरज असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी बुद्ध आणि गांधींच्या पवित्र भूमीत G20 ची बैठक होईल तेव्हा भारत जगाला शांततेचा मजबूत संदेश देईल असही ते म्हणाले. भारताची ऊर्जा सुरक्षा जागतिक विकासासाठी महत्त्वाची आहे. जगानं ऊर्जा पुरवठ्यावर कोणत्याही प्रकारच्या निर्बंधांना प्रोत्साहन देऊ नये, असं मोदी म्हणाले. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1