महत्वाच्या घडामोडी
तेलंगण, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणुकांची उद्या मतमोजणी            औपचारिक पदवी हे शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट न ठेवता, बदलणाऱ्या जगात निरंतर शिक्षणाचं ध्येय ठेवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन            संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रत्येक विषयावर चर्चेची सरकारची तयारी-केंद्रीय संसदीय कार्य मंत्री            देशातल्या शेतीची उत्पादकता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी एकत्रित प्रयत्न सुरू - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल            राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या लोकांमुळे पक्ष संघटना स्वच्छ व्हायला मदत झाल्याचा शरद पवार यांचा दावा           

Oct 04, 2022
9:30PM

रशिया-युक्रेन समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी सर्व प्रकारची मदत करायला भारत तयार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं युक्रेनला आश्वासन

AAKASHWANI
रशिया-युक्रेनमधल्या वादात शांततेच्या मार्गाने काढण्यात येणाऱ्या तोडग्यासाठी सर्व प्रकारची मदत करायला भारत तयार आहे, असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांना दिलं आहे. मोदी यांनी आज झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली. रशिया आणि युक्रेननं हे युद्ध ताबडतोब थांबवावं आणि चर्चेच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा काढावा अशी भूमिका प्रधानमंत्र्यांनी पुन्हा यावेळी मांडली. लष्करी कारवाईतून ही समस्या सुटणार नसून युक्रेनसह जगभरातल्या आण्विक शस्त्रांच्या सुरक्षेची भारताला काळजी आहे. आण्विक शस्र धोक्यात सापडली तर त्याचे दीर्घावधी परिणाम होतील, असं मोदी यावेळी म्हणाले. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1