महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 23, 2022
7:32PM

लसीकरण मोहिमेत खबरदारीची लसमात्रा घेतलेल्यांची संख्या २० कोटीच्या वर

आकाशवाणी
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून १२ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१७ कोटी ३८ लाखाच्या वर गेली आहे. आज साडे ९ लाखापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली. आत्तापर्यंत २० कोटी ३ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.

राज्यात आज सकाळपासून ४० हजार नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ६९ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८९ लाख ९३ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1