महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 23, 2022
7:35PM

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

आकाशवाणी
मुंबई उच्च न्यायालयानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. यासंदर्भात शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं येत्या ५ ऑक्टोबरला, दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे गटाला परवानगी दिली.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायची परवानगी मिळावी असा अर्ज उद्धव ठाकरे तसंच शिंदे गटानं मुंबई महापालिकेकडे दाखल केला होता. महापालिकेनं कायदा आणि सुव्यवस्थेचं  कारण देत दोघांना  परवानगी नाकारली होती. शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 
  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1