महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 23, 2022
2:46PM

नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणाच्या पुस्तकाचं प्रकाशन

आकाशवाणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांचं संकलन आज नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवनात प्रकाशित झालं. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास - प्रधानमंत्री नरेंद मोदी के भाषण’ असं या पुस्तकाचं नाव असून हे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधून प्रकाशित  होत आहे. या समारंभाला केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद, माजी उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर,आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या पुस्तकात प्रधानमंत्र्यांनी मे  २०१९ पासून मे २०२० पर्यंत केलेल्या ८६ भाषणांचा समावेश आहे. आत्मनिर्भर भारत, कोविड विरुद्धचा लढा, परराष्ट्र व्यवहारातील भारताची बदलती भूमिका, जय किसान, इत्यादी १० विषयांमध्ये हि भाषण विभागली असून नूतन भारताच्या नागरिकांच्या आशा आकांक्षांना जनसहभागाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं प्रधानमंत्र्यांचं स्वप्न या पुस्तकातून दर्शवल आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1