महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 23, 2022
7:40PM

जगाला भेडसावणाऱ्या समस्यांचं शाश्वत स्वरूपात निराकरण करण्यात नवभारत जगाचं नेतृत्व करत आहे - प्रधानमंत्री

आकाशवाणी

जगाला भेडसावणाऱ्या समस्यांचं शाश्वत स्वरूपात निराकरण करण्यात नवभारत जगाचं नेतृत्व करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये एकता नगर इथं आयोजित केलेल्या सर्व राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झालं, त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी पासून पर्यावरणास्नेही जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या 'लाइफ मूव्हमेंट' या जागतिक उपक्रमापर्यंत भारत सर्वात पुढे आहे, असं ते म्हणाले.

नवीन भारत, नवीन दृष्टिकोन आणि नव्या विचारांच्या साहाय्यानं झेप घेत आहे, भारत आज एक झपाट्यानं विकसित होणारी अर्थव्यवस्था असून पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत आहोत, पर्यावरण रक्षण ही वैयक्तिक नाही तर सामूहिक जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. भारताच्या वनक्षेत्रात वाढ झाली असून पाणथळ जागांची संख्या देखील वाढली आहे, गेल्या काही वर्षांत गिर मधले  सिंह, वाघ, हत्ती, एकशिंगी गेंडा आणि बिबट्या यांची संख्या वाढली आहे. भारतात चित्यांचं झालेलं स्वागत म्हणजे भारताच्या आदरातिथ्याचं उदाहरण आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. सर्व राज्यांनी पर्यावरण संवर्धनासाथीच्या सर्वोत्तम पद्धती जाणून घ्याव्यात आणि देशभरात त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असं आवाहन त्यांनी केलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1