महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 24, 2022
11:13AM

नवीन आष्टी – अहमदनगर रेल्वे मार्ग बीड आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास

twitter
पहिल्या टप्प्यातील आष्टी – अहमदनगर रेल्वेने दिवंगत गोपिनाथराव मुंडे यांच्यासह सर्वांच्या मनातील स्वप्नपूर्तीची सुरवात होत आहे, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल सांगितलं. आष्टी – अहमदनगर या नवीन रेल्वे मार्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. बीडपर्यंतचा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानसही दानवे यांनी यावेळी व्यक्त केला. या मुख्य प्रकल्पासाठी 96 टक्के भूसंपादन पूर्ण झालं आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणारं नाही.

अशी ग्वाही दानवे यांनी दिली.हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ते या कार्यक्रमात दूरस्थ माध्यमातून बोलत होते.

राज्यातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्यावर आपलं सरकार भर देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते न्यू आष्टी- अहमदनगर डेमू सेवेचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.या प्रकल्पासाठी आवश्यक तो भरीव निधी केंद्र आणि राज्य शासनानं दिला. राज्याचा भागिदारी हिस्सा सुरू करण्याचा निर्णयही या शासनानं घेतला, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोक प्रतिनिधींच्या मागणीनुसार कृष्णा – मराठवाडा प्रकल्पास सुधारित मान्यता देऊन भरीव निधी दिला जाईल. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर इथल्या रेल्वे डबा कारखान्याचं लवकरच लोकार्पण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1