महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Mar 20, 2022
9:11PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री उद्या दुसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया शिखर परिषदेत सहभागी होणार

airnewsalerts
प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे  प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन उद्या दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित दुसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. ४ जून २०२० रोजी आयोजित पहिल्या शिखर परिषदेनंतर ही दुसरी परिषद होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

या परिषदेत दोन्ही नेते व्यापक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत केलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेतील. तसंच महत्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील. उभय देश  व्दिपक्षीय  संबंध आणि  दृढ सहकार्य मजबूत करण्यावर  या परिषदेत  भर देतील. कोविड-१९ महामारीचं संकट असतानाही दोन्ही देशांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण, जल स्रोत व्यवस्थापनासह सार्वजनिक प्रशासन आणि  शासन आदी क्षेत्रांत परस्पर सहकार्य सुरु ठेवलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1