महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Jan 14, 2022
9:27PM

रेल्वे इंजिनातल्या बिघाडामुळं पश्चिम बंगालमध्ये काल रेल्वे अपघात झाल्याचा प्राथमिक अहवाल

आकाशवाणी

पश्चिम बंगालमधे दोमोहनी रेल्वे स्थानकाजवळ गुवाहाटी-बिकानेर एक्सप्रेस रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातस्थळाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज भेट दिली. प्राथमिक अहवालानुसार तरी रेल्वेच्या इंजिनात असलेल्या बिघाडामुळं हा अपघात घडल्याचं ते म्हणाले. याप्रकरणी सविस्तर चौकशी केली जाणार आहे. या अपघातात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी झाले आहेत. त्यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. काल संध्याकाळी झालेल्या या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये, गंभीर जखमींना १ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. या सर्वांना मदतीच्या रकमेचं विक्रमी वेळेत वाटप करण्यात आलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1