महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Jan 14, 2022
2:20PM

पश्चिम बंगाल मधल्या रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू

आकाशवाणी
पश्चिम बंगालमधे दोमोहनी रेल्वे स्थानकाजवळ गुवाहाटी-बिकानेर एक्सप्रेस रुळावरुन घसरुन काल संध्याकाळी झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या ९, तर जखमींची संख्या ३६ झाली आहे. काल संध्याकाळी ५ वाजता हा अपघात झाला. या अपघातानंतर त्याठिकाणी अडकून पडलेल्या २९० प्रवाशांना रात्री १० वाजता विशेष गाडीनं पाठवून दिल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

या दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय रेल्वेसुरक्षा चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. गंभीर जखमींना १ लाख रुपये, तर किरकोळ जखमी झालेल्यांना २५ हजार रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळीच रेल्वेमंत्र्यांकडून स्थितीचा आढावा घेतला.

या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांबद्दल त्यांनी सहानुभुती व्यक्त केली असून, जखमी प्रवाशांची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा ट्विट संदेशात व्यक्त केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वेमंडळाचे अध्यक्ष वि के त्रिपाठी आणि सुरक्षा महासंचालकांनी आज सकाळी दुर्घटना स्थळी भेट दिली. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1