महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Aug 09, 2021
10:56AM

अत्याचार प्रकरणातील सात आरोपी शिक्षा भोगून तुरुंगातून सुटल्यानं कोठेवाडीत अस्वस्थता

आकाशवाणी
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी इथल्या दरोडा आणि बलात्कार प्रकरणातील सात आरोपी शिक्षा भोगून तुरुंगातुन सुटले आहेत. त्या पार्श्वभुमीवर कोठेवाडीत अस्वस्थता आहे.

नागरीक आणि महिलांच्या मनात भितीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी काल दुपारी कोठेवाडीत येऊन ग्रामस्थांसोबत सवांद साधला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना ग्रामसुरक्षा दलाच्या आधुनिक अँपचा वापर करुन सजग राहावं असं आवाहन केलं.

ग्रामसुरक्षा दलाचे संचालक डी.के.गोर्डे यांनी मोबाईल सुरक्षा अँपची माहीती दिली आणि त्याचा वापर कसा करावा याचं प्रात्यक्षिक दाखविलं. या आरोपींची महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून सुटका करण्यात येत असल्याचा निकाल औरंगाबाद खंडपीठानं नुकताच काल दिला होता.

त्यांच्या अन्य गुन्ह्यातील शिक्षा प्रलंबित राहिलेली नसेल तर त्यांना तुरुंगातून सोडण्यात यावं असंही या आदेशात म्हटलं होतं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1