महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
8:04PM

प्रमाणित वाहन प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतल्यास परवान्यासाठी परीक्षेची गरज नाही

आकाशवाणी
वाहनचालकाचं प्रशिक्षण देणाऱ्या अधिस्वीकृतीधारक संस्थांकरताचे अनिवार्य नियम विशद करणारी अधिसूचना केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं जारी केली आहे. येत्या १ जुलै पासून ती लागू होईल. अशा संस्थांकडे स्वतःचा वाहन रपेटीचा मार्ग, आणि प्रशिक्षणासाठी आवश्यक संगणक आणि इतर यंत्रसामुग्री असणं बंधनकारक आहे. अशा प्रशिक्षण केंद्राची परीक्षा उत्तीर्ण झाल्यास वाहन चालक परवान्यासाठी परिवहन कार्यालयाची चाचणी देण्याची गरज राहणार नाही. कुशल, प्रशिक्षित वाहनचालकांचा अभाव हे रस्ते अपघातांचं महत्त्वाचं कारण असल्यानं या सुधारणा करण्यात आल्या आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8