महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
7:24PM

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ४ पूर्णांक ४० दशांश टक्के झाल्यानं या आठवड्यात मुंबईचा दुसऱ्या स्थरात समावेश

आकाशवाणी
राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये ७ जूनपासून शिथिलता देण्यात आली आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५ पूर्णांक २५ दशांश वरून ४ पूर्णांक ४० दशांश टक्के झाल्यानं या आठवड्यात मुंबईचा समावेश दुसऱ्या स्थरात झाला आहे. यामुळे मुंबईमध्ये दुसऱ्या स्थरातील निर्बंध लागू व्हायला हवे होते. मात्र कोरोनाच प्रसार अद्याप कमी झाला नसल्यानं तिसऱ्या स्थरातील निर्बंध यापुढे आणखी काही दिवस लागू राहतील. यामुळे मुंबईकरांना सध्या तरी दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. मात्र पालिकेनं दुसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता दिल्यास कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. यामुळे दहा ते पंधरा दिवस आम्ही वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत. दुसऱ्या स्थरातील निर्बंध लागू करण्याबाबत महापालिकेनं कोणताही निर्णय घेतलेला नाही असे मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8