महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
7:19PM

देशात काल १ लाख ३४ हजार ५८ रुग्ण कोरोनामुक्त

आकाशवाणी
देशात काल सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या १ लाखाहून कमी होती काल ९१ हजार ७२ नवे कोरोनाबाधित आढळले. काल २२९ व्या दिवशी बरे झालेल्या रुग्णांची संख्या बाधीतांपेक्षा जास्त होती. गेल्या २४ तासात १ लाख ३४ हजार ५८ रुग्ण बरे झाले त्यामुळेउपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही ४६ हजार २८१ इतकी घट नोंदवण्यात आली आहे.

काल दिवसभरात ३ हजार ४३ रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरातल्या आत्तापर्यंतच्या कोरोना बाधितांची संख्या आता २ कोटी ९२ लाख ७४ हजार ८२३ झाली असली तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाण सातत्यानं कमी होत आहे. काल साडे चार टक्क्यांवर आलं. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढून जवळपास ९५ टक्के झालं आहे. आत्ता पर्यंत २ कोटी ७७ लाख ९ हजार ७३ रुग्ण बरे झाले आहेत. या रोगानं दगावलेल्यांची एकंदर संख्या ३ लाख ६३ हजार ७९ एवढी आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8