महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
8:05PM

प्रधानमंत्री जी ७ देशांच्या परिषदेत सहभागी होणार

आकाशवाणी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आणि परवा जी ७ देशांच्या परिषदेत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कॅनडा, जर्मनी, इटली, फ्रान्स,जपान यु.के. आणि अमेरिका या संपन्न लोकशाही देशांच्या या अनौपचारिक संघटनेनं इतर देशांशी संवाद साधण्याकरता आयोजित केलेल्या परिषदेचं यजमानपद यंदा ब्रिटनकडे आहे. भारतासह, दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना आमंत्रण आहे. प्रधानमंत्री मोदी दुसऱ्यांदा या परिषदेत सहभागी होणार आहेत.

कोरोना संकटाचा मुकाबला, समृद्ध भविष्यासाठी मुक्त व्यापाराला चालना, जैवविविधतेचं रक्षण, हवामान बदलाच्या आव्हानांना समोरं जाण्यासाठी उपाययोजना आणि खुल्या समाज निर्मितीसाठी सामायिक मूल्यांची जोपासना याच्यासह लोकशाहीच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8