महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jun 08, 2021
11:38AM

संयुक्त राष्ट्रांच्या ७६ व्या महासभेच्या अध्यक्षपदी मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहीद यांची निवड

आकाशवाणी

संयुक्त राष्ट्रांच्या ७६ व्या महासभेच्या अध्यक्षपदी मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहीद यांची निवड झाली आहे. १९३ सदस्यांच्या महासभेत शाहीद यांना १४३ मतं मिळाली. येत्या सप्टेंबरपासून ते पदाचा कार्यभार स्वीकारतील.

या पदावर शाहीद यांची निवड झाल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. शाहीद यांची निवड म्हणजे मालदीवचं जगात महत्त्व वाढत असल्याचं निदर्शक असल्याचं जयशंकर यांनी ट्वीटर वर म्हटलं आहे.

शाहीद यांच्या सहकार्यानं संयुक्त राष्ट्रांची बहुस्तरीय व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू, असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1