महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 17, 2021
1:27PM

ब्लॉगर आणि विज्ञान लेखक अविजित रॉय यांच्या २०१५ मध्ये करण्यात आलेल्या हत्त्याप्रकरणी पाचजणांना मृत्यूदंडाची आणि एकाला जन्मठेपेची शिक्षा

आकाशवाणी
ब्लॉगर आणि विज्ञान लेखक अविजित रॉय यांच्या २०१५ मध्ये करण्यात आलेल्या हत्त्याप्रकरणी बांगलादेशातील ढाका दहशतवादविरोधी लवादाने काल पाचजणांना मृत्यूदंडाची आणि एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा देण्यात आलेले सर्वजण बंदी घालण्यात आलेल्या अन्सार – अल – इस्लाम या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत.

अविजित रॉय यांनी आपले उभे आयुष्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्याच्या प्रयत्नांसाठी खर्ची घातले. त्यांची हत्त्या म्हणजे या स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न असून त्याद्वारे समाजात भीतीचं वातावरण निर्माण करणे हाच होता. तो अत्यंत आक्षेपार्ह आहे, असं मत लवादान हा निकाल देताना नोंदविलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1